पुणे जिल्हा प्रतिनिधी : प्रविन मोरे
मुंबई:महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयातून काय निर्णय येणार याकडे राज्याचे लक्ष लागलेले आहे . दोन्ही गटाच्या वकिलांनी आपले म्हणणे मांडले असून न्यायालय काय निर्णय देणार याकडे देशाचे लक्ष लागलेले आहे .
मात्र सर्वोच्च न्यायालयाने पक्षचिन्हासंदर्भात एक मोठा निर्णय दिला असून त्यामुळे शिंदे गटाला दलासा मिळाला असून उध्दव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे .
सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या कामात ढवळाढवळ करण्यास मनाई केली असून यामुळे पक्षचिन्हासंदर्भात निवडणूक आयोग आपला निर्णय देऊ शकते या सुनावणीमुळे उध्दव ठाकरेंच्या वकिलांनी यावर स्थगिती आणण्यासाठी प्रयत्न केले होते मात्र न्यायालयाने स्थगिती देण्यास मनाई केली आहे .
0 टिप्पण्या