Ticker

6/recent/ticker-posts

वीर महाराष्ट्र न्यूज चॅनेलचा एक्झिट पोल १०० टक्के खरा ठरला

प्रतिनिधी : जुबेर शेख 

तुळजापूर : तुळजापूर तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला असून, वीर महाराष्ट्र न्यूज चॅनेलने मतदानानंतर दाखवलेला एक्झिट पोल शंभर टक्के तंतोतंत खरा ठरला आहे. यामुळे पुन्हा एकदा वीर महाराष्ट्र न्यूज चॅनेलच्या सर्वेक्षणाच्या विश्वासार्हतेवर शिक्कामोर्तब झाले आहे.

तुळजापूर तालुक्यातील एकूण नऊ जिल्हा परिषद मतदारसंघांपैकी सहा ठिकाणी महायुतीने सत्ता मिळवली आहे. उर्वरित तीन जागांवर काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आणि इतर समाजवादी पक्षांनी प्रत्येकी एक-एक जागा जिंकत आपले अस्तित्व कायम राखले आहे.

दि. ७ फेब्रुवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर सर्व प्रमुख न्यूज चॅनेल्सकडून एक्झिट पोल जाहीर करण्यात आले. त्याच पार्श्वभूमीवर वीर महाराष्ट्र न्यूज चॅनेलच्या वतीने तुळजापूर तालुक्यासाठी सखोल सर्वेक्षणावर आधारित एक्झिट पोल प्रसिद्ध करण्यात आला होता.

या एक्झिट पोलमध्ये

महायुती – ६ जागा

महाविकास आघाडी – २ जागा

इतर – १ जागा

असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.

आज अधिकृत निकाल जाहीर झाल्यानंतर वीर महाराष्ट्र न्यूज चॅनेलचा एक्झिट पोल अक्षरशः तंतोतंत खरा ठरला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील राजकीय घडामोडींचे अचूक विश्लेषण, जमिनीवरील वास्तवाचा अभ्यास आणि विश्वासार्ह पत्रकारिता याचे पुन्हा एकदा उत्तम उदाहरण वीर महाराष्ट्र न्यूज चॅनेलने सादर केले आहे.

याआधीही विविध निवडणुकांमध्ये वीर महाराष्ट्र न्यूज चॅनेलचा सर्वे मोठ्या प्रमाणावर अचूक ठरलेला असून, या निकालामुळे प्रेक्षकांचा आणि वाचकांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.

तुळजापूर तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने वीर महाराष्ट्र न्यूज चॅनेलने पुन्हा एकदा “बातमी नव्हे, सत्य” हे ब्रीदवाक्य सार्थ ठरवले आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या