तुळजापूर : प्रतिनिधी
तुळजापूर शहरापासून काही अंतरावर सिंदफळ शिवारा जवळील खपले वस्ती परिसरात परवा संध्याकाळी वेळ ५ : ३० वाजण्याच्या सुमारास अज्ञात मारेकऱ्यानी कत्तीने वार करुन खुन केल्याची घटणा घडली होती.
मसला ( खुर्द ) येथील ज्ञानेश्वर करंडे हे आपल्या टीव्हीएस मोटर सायकल क्रमांक MH13 CP 7609 वरून मसला खुर्दकडे जात असताना खपले वस्तीजवळ दोन अनोळखी इसमानी गावाकडे जाणाऱ्या ज्ञानेश्वर करंडे यांच्या पोटामध्ये तीक्ष्ण धारदार हत्याराने ( कत्तीने ) वार करून जागीच ठार केले होते.यातील २ आरोपीना पकडण्यात पोलीसांना २४ तासाच्या आत पोलिस प्रशासनाच्या पतकाने दोन आरोपी ताब्यात घेतले यात रामेश्वर संभाजी खोचरे याला उस्मानाबाद येथील सांजा येथे सापळा रचुन पकडण्यात आले तर अनिता सतिष भोसले यांना औसा तालुक्यातून अटक करण्यात आली आहे.या गुन्हयात आरोपीने आपली मोटार सायकल व मोबाईल घटनास्थळावरून टाकुन पळाले होते.
यात दोन्ही आरोपीना कोर्टासमोर हजर केले असता कोर्टाने दोन्ही आरोपीना ४ दिवसाची पोलीस कोठली दिली आहे. पोलीस आता उर्वरित २ आरोपीचा शोध घेत आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी डाँ. सई भोरे -पाटील पोलिस निरिक्षक अजिनाथ काशिद यांचा अनुभव आरोपी शोधण्यास कामी आला आहे. २ पथके वेगवेगळ्या ठिकाणी पाठवले व आरोपीच्या मार्गावर राहिले या मुळे २ आरोपी सापडले आहेत.
गुन्हयाची पार्श्वभूमी
मयत ज्ञानेश्वर नाना करंडे यांच्या मावस बहिणी बरोबर आरोपी रामेश्वर संभाजी खोचरे रा. येवती ता. तुळजापुर याचे प्रेम प्रकरण चालु होते. या प्रेमाला ज्ञानेश्वर करंडे याचा विरोध होता. मयत ज्ञानेश्वर करंडे व आरोपी रामेश्वर खोचरे हे नात्याने सख्खे मावस भाऊ असुन तिच्या मावस बहीणी बरोबर प्रेम प्रकरण होते ते ती सुध्दा नात्याने मावस बहिण होती या प्रेम प्रकरणा बाबत मयत ज्ञानेश्वर करंडे याने आरोपीच्या घरच्याना बोलावुन बैठक घेतली व समज दिली हे नाते समाजात बदनामी करणारे असुन या मुळे बदनामी होईल तसेच मुलीच्या भविष्यासाठी आरोपीच्या नावा वरिल उस्मानाबाद येथील फ्लाँट मुलीच्या नावे केला होता याचा राग मनात धरुन हि हत्या करण्यात आली आहे या बाबत मयताचा भाऊ भैरुनाथ नाना करंडे याने रामेश्वर संभाजी खोचरे, संभाजी खोचरे, परमेश्वर खोचरे, अनिता सतिष भोसले रा. येवती यांच्या विरोधात तुळजापुर पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती. आरोपी विरोधात गु.र.नं २०९ / २०२२ कलम ३०२,३४ भा.द.वी सह ४.२५ आर्म अँक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरिक्षक आजिनाथ काशिद सपोनि ज्ञानेश्वर कांबळे सपोनि चासकर हे करत असुन यात दोन आरोपी अजुन फरार आहेत.
0 टिप्पण्या